⚡सावंतवाडी ता.१७-:
धाकोरे गावातील सरकारी २३ नंबर रस्ता (होळीचे भाटले – बांदिवडेवाडी मार्ग) अद्यापही पूर्णपणे मोकळा आणि पक्का न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, रस्ता सुटेपर्यंत सर्व निवडणुकांचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामस्थांचे स्पष्ट विधान –
“सरकारी रस्ता पूर्णपणे मोकळा व पक्का झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही.”
हा मार्ग शाळकरी मुले, गर्भवती महिला, रुग्ण, वृद्ध आणि ३०० हून अधिक नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, अडथळ्यांमुळे अपघाताचा धोका सतत वाढत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून उपोषण, निवेदनं आणि मोजणी प्रक्रियेनंतरही प्रशासकीय स्तरावर ठोस कायमस्वरूपी काम न झाल्याने ग्रामस्थांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.
धाकोरे व बांदिवडेवाडी ग्रामस्थ
