भाजपने आचरेकर दाम्पत्याला नाकारली उमेदवारी..
⚡मालवण ता.१७-:
मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आज प्रभाग सात मधून नगरसेवक पदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मालवणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, पत्नी सौ. स्नेहा आचरेकर यांच्यासाठी नगराध्यक्ष पदाची व आपल्यासाठी नगरसेवक पदाची उमेदवारी आपण भाजप पक्षाकडे मागितली होती. मात्र, या दोन्हीही उमेदवारी भाजपकडून नाकरण्यात येऊन प्रभाग सात मध्ये नवख्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे आपण अपक्ष उमेदवारी दाखल केली असून माझ्या प्रभागातील लोकांचे प्रेम व साथ माझ्यासोबत आहे, गत निवडणुकीत आपण अपक्ष म्हणून निवडून येऊन ताकद दाखवली आहे, आता पुन्हा एकदा अपक्ष लढून माझी ताकद सर्वच पक्षांना दाखवून देईन, असा विश्वास यावेळी सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला.
