⚡बांदा ता.१५-: बांदा पानवळ येथील बेपत्ता असलेले गजानन मांजरेकर यांचा मृतदेह काही दिवसांनी १५ फुट खोल ओहळात निदर्शनास आला. त्यावेळी सदर मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्वतः ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी पोलीसांसोबत ओहळात उतरत मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. त्यांच्या सोबत गुरु धारगळकर, महेंद्र दादा, प्रकाश धारगळकर,भरत धारगळकर शेखर हडपडकर ग्रामस्थानी सुद्धा मदत केली. संध्याकाळी उशिरा ची वेळ होती काळोख झाला होता. मृतदेह ओहळात एका पडलेल्या झाडाच्या खाली अडकलेल्या अवस्थेत होता अशाही परिस्थितीत ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, माजी उपसरपंच गुरू धारगळकर, महेंद्र दादा, प्रकाश धारगळकर,भरत धारगळकर शेखर हडपडकर, बांदा पोलीस यांच्या मदतीने सदर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला होता.ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी समाजकार्य बरोबर आपले एक लोकसेवेचे कर्तव्य म्हणून अतुलनीय कार्य केले.
माजी उपसरपंच तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ राजाराम सावंत यांचे अतुलनीय कार्य…
