नगराध्यक्ष पदासाठी समीर नालावडेंनी केला अर्ज दाखल….

कणकवली : कणकवली नगराध्यक्षपदी भाजपा कडून समीर नलावडे यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. कणकवली नगरपंचायत चे निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे हा अर्ज सादर करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, बंडू हर्णे, गावचे मानकरी सदानंद राणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, राजू गवाणकर, अण्णा कोदे, संदीप नलावडे, अॅड. विराज भोसले, बंडू गांगण, मेघा गांगण, प्रणाम कामत, राजा पाटकर, महेश गुरव, सुरेश सावंत, अनिस नाईक, विशाल कामत, राज नलावडे, पंकज पेडणेकर, विराज राणे, वागदे सरपंच संदीप सावंत, संजय ठाकूर, गंगाधर सावंत, सदानंद राणे, मनोज राणे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेली अनेक दिवस घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे भाजपाकडून नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवार कोण असणार? हे चर्चेत असतानाच काही दिवसांपूर्वी समीर नलावडे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडे एकमेव आल्याने ते निश्चित झाले होते. त्यानंतर उर्वरित उमेदवारांची ही नावे अंतिम टप्प्यात आली. अखेर समीर नलावडे यांनी आज भाजपाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला.

You cannot copy content of this page