बांदा रोट्रॅक्ट क्लबतर्फे निमजगा येथे बालदिनानिमित्त आनंद उपक्रम…

⚡बांदा ता.१४-: बालदिनाचे औचित्य साधत बांदा रोट्रॅक्ट क्लबतर्फे अंगणवाडी निमजगा येथे लहानग्यांसोबत आनंदमयी उपक्रम आयोजित करण्यात आला. क्लबच्या सदस्यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधत विविध खेळ खेळले आणि संपूर्ण वातावरण हास्य आणि आनंदाने भरून गेले. उपक्रमाचा शेवटी मुलांना खाऊ व आकर्षक गिफ्टचे वितरण करण्यात आले.


या उपक्रमासाठी अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे आणि श्रीमती सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मदतीमुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक सुरळीत आणि उत्साहवर्धक पार पडला. यावेळी रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष रोहन कुबडे, उपाध्यक्ष दत्तराज चिंदरकर, सचिव मिताली सावंत, सहसचिव संकेत वेंगुर्लेकर, तसेच नेहा निगुडकर, मयूर मसुरकर आदी उपस्थित होते. रोट्रॅक्ट क्लबच्या या उपक्रमामुळे बालदिन अधिक अर्थपूर्ण झाला असून समाजातील लहानग्यांवर सकारात्मक छाप उमटविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
फोटो:-
बांदा निमजगा येथील चिमुकल्यासोबत बालदिन साजरा करताना रोट्रॅक क्लबचे पदाधिकारी व सदस्य.

You cannot copy content of this page