⚡सावंतवाडी ता.१३-:
सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्त्या सीमा मठकर यांनी अखेर माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी सीमा मठकर यांनी मशाल चिन्ह हाती घेत पक्षनिष्ठेची शपथ घेतली. कार्यक्रमाला जिल्हा व तालुका शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीमा मठकर यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की, “शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवूनच मी हा निर्णय घेतला आहे. महिला सक्षमीकरण आणि समाजसेवा हे माझे ध्येय राहील.”
