⚡वेंगुर्ले ता.०४-: कर्ज योजनांचा महिलांनी लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम बनावे, असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ यांनी केले.
भाजपा महीला मोर्चा , वेंगुर्ला व भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून महीलांसाठी मोफत प्रशिक्षण घेण्यात आले.याचे औचित्य साधत वेंगुर्लातील महिला व युवतींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सैनिक पतसंस्थेने युवा स्वावलंबी व वीरांगना ह्या दोन कर्ज योजनांची माहिती संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ यांनी दिली.
ह्या योजनांच्या आधी संस्थेने हिरकणी महिला कर्ज योजना आणली होती, त्या योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच संस्थेने विरांगना व युवा स्वावलंबी या दोन कर्ज योजना सुरू केल्या आहेत. या कर्ज योजनांचा महिलांनी लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम बनावे, असे आवाह श्री. राऊळ यांनी केले. यावेळी संस्थेचे चेअरमन
बाबुराव कवीटकर यांनी महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी सैनिक पतसंस्थेच्या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा व आत्मनिर्भर बनावे असे प्रतिपादन केले.यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर व महिला मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक
ज्योती देसाई यांनी आभार मानले
