शिवसेना कणकवली शहरविकासासाठी देणार प्राधान्य ; विरोधी गटनेता सुशांत नाईक यांची माहिती
*💫कणकवली दि.१०-:* खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली नगरपंचायत ला वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत तब्बल 35 लाखांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. या विकासनिधीसाठी शिवसेनेचे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी केली होती. त्याला यश आले असून तब्बल 35 लाख रुपयांचा विकासनिधी कणकवली नगरपंचायत ला मंजूर झाला आहे. या निधीतून कणकवली शहरातील विविध विकासकामे केली जाणार असल्याचे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी सांगितले.