*💫मालवण दि.०८-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त १६ मे रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘परिचय मान्यवरांना प्रभावित केलेल्या पुस्तकाचा’ या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साधना साप्ताहिकाच्या ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ या विशेषांकावर आधारित ३० प्रश्न विचारले जाणार आहेत. विशेषांकाची पीडीएफ सेवांगण उपक्रम समूहवर उपलब्ध होईल. प्रश्न सेवांगण उपक्रम समूह व सेवांगण फेसबूकवर पाठविली जाईल. यशस्वी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्रे वितरित करण्यात येतील. नावनोंदणी व प्रश्नांची उत्तरे दीपक भोगटे ९४२३८३३१६३ या क्रमांकावर पाठवावीत. नाव नोंदणी १० मेपर्यंत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेवांगणतर्फे १६ रोजी पुस्तक दिनानिमित्त स्पर्धा…
