⚡मालवण ता.०७-:
मालवण- पोईप, खोटले, हेदूळ, कसाल मार्गे सिंधुदुर्गनगरी पर्यंत एस.टी. बसच्या फेऱ्या सुरु कराव्यात, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत पोईप सरपंच श्रीधर नाईक यांनी मालवण आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
यावेळी माजी सभापती सुधीर साळसकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, संदीप भोजने आदी उपस्थित होते.
पोईप कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांच्या शाळकरी मुलांची वाहतुकीची गैरसोय होत असल्यामुळे मालवण पोईप, खोटले, हेदूळ, कसाल मार्गे सिंधुदुर्गनगरी पर्यंत जाणारी एस.टी. बस ची सकाळी ठीक ८ वा. ची फेरी व दुपारी २ वा. ची फेरी, सायं. ५ वा. ची ओरोस सिंधुदुर्गनगरी कसाल मार्गे हेदूळ खोटले पोईप मालवण अशी सुरु करण्यात यावी. जेणेकरून ग्रामस्थांची जिल्हा रुग्णालयात जाण्याची, शाळेतील मुलांची या मार्गांवर प्रवासाची गैरसोय होणार नाही. तरी या बस फेऱ्या सुरु कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
