वाफोली धरण परिसरात तीन बॅटऱ्या लंपास…

चोर सराईत असल्याचा स्थानिकांचा अंदाज..

⚡बांदा ता.०४-: बांदा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून घरफोडीबरोबरच वाहनांनाही चोरांनी लक्ष केले आहे. काल रात्री वाफोली धरण परिसरात उभ्या करून ठेवलेल्या डंपरमधील तीन बॅटऱ्या चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत लंपास केल्या.
बांदा-दाणोली मार्गावरून नेहमी मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असतात. मात्र या मार्गालगत असलेल्या घरे व वाहनांवर चोरांचा डोळा असल्याचे यापूर्वीच्या घटनांतून स्पष्ट झाले आहे. नुकतेच विलवडे येथे दोनवेळा घरफोडी झाली होती. तरीदेखील चोरांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. या मार्गावरील अनेक गावांमध्ये वारंवार चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावर गस्त वाढवून चोऱ्यांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या चोरीची पोलिसात नोंद करण्यात आली नाही.
फोटो:-
वाफोली येथे डंपरच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्यात.

You cannot copy content of this page