कणकवली : वनक्षेत्रपाल कणकवली यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मौजे डामरे गावच्या हद्दीत स्वामी समर्थ मठ परिसरात बिबट्याच्या नखं व दात विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार वनक्षेत्रपाल कणकवली आणि त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत चार संशयित आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेल्या आरोपींत विजय महादेव हळदिवे (रा. फोंडाघाट, ता. कणकवली), कृष्णात भिकाजी रेपे (रा. अकनूर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), तौफीक अल्लाउद्दीन सनदी (रा. गळतगा, ता. चिकोडी, जि. बेळगाव) आणि परशुराम प्रकाश बोधले (रा. नवलोहळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून बिबट्याची बारा नखे, चार सुळे तसेच या आरोपींकडून तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.
आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक एस. के. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. पाटील, वनपाल, श्री. धुळू कोळेकर, वनपाल देवगड श्री. श्रीकृष्ण परीट, वनपाल दिगवळे श्री. सर्जेराव पाटील, वनरक्षक श्री. सुखदेव गळवे, श्री. प्रतिराज शिंदे, श्री. सिध्दार्थ शिंदे, श्री. रामदास घुगे, श्री. नितेंद्र पोर्लेकर, श्री. रोहित सोनगेकर, श्रीम. स्वाती व्हनवाडे, व श्री. रिध्देश तेली चालक वनपाल व वनरक्षक यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सहभाग घेतला.
वनविभागाने आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांबाबत कुणाकडेही माहिती असल्यास ती कणकवली वनविभागाला कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
