⚡सावंतवाडी ता.२८-: गणेशोत्सव २०२५ निमित्त मळगाव गावात घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गावातील सर्व गणेशभक्तांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भिल्लवाडी गृप अध्यक्ष तथा समाजसेवक श्री. पांडुरंग राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसाठी अनुक्रमे ₹५,००१, ₹३,००१ आणि ₹२,००१ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय इतर उत्तेजनार्थ बक्षिसे देखील प्रदान केली जातील.
स्पर्धेच्या नियमांनुसार, प्रत्येक स्पर्धकाने १ मिनिटाचा व्हिडिओ तयार करून Instagram वर pandurangrawool ला Tag करावा किंवा आयोजकांच्या WhatsApp नंबरवर पाठवावा. व्हिडिओखाली स्पर्धकाचे नाव व मोबाईल क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. स्पर्धा फक्त मळगाव गावापुरती मर्यादित असून, या स्पर्धेत सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क घेण्यात येणार नाही. स्पर्धेच्या परीक्षकांच्या निरीक्षणांवरून विजेते ठरविण्यात येतील.
अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. पांडुरंग राऊळ – ९९६७३३३१००
अक्षय राऊळ – ९३२४५७७०१५
बाबू राऊळ – ७६६६५६५१००
दिप गावकर – ७९७७८२७४८२
सुरज राऊळ – ८४५९६३२०७५
गावातील सर्व गणेशभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन भिल्लवाडी गृप अध्यक्ष तथा समाजसेवक पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.