म्हापण विठ्ठल मंदिरात २ ऑगस्ट पासून हरिनाम सप्ताह…

कुडाळ : वेंगुर्ले तालुक्यात म्हापण खालचीवाडी येथील विठ्ठल मंदिरात २ ऑगस्ट रोजी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी श्री ची पूजा धार्मिक विधी व ९ वा कलश पूजन होईल त्यानंतर सप्ताहाला प्रारंभ होईल सप्ताह निमित्त पंचक्रोशीतील भजनी मंडळाचे भजने होणार आहेत.
सकाळी नऊ वा स्थानिक ग्रामस्थांची भजने, ११ वा निवती महिला मंडळाचे भजन, दुपारी १.३० वा शांतादूर्गा महिला मंडळ म्हापण यांचे भजन, दुपारी 2.30 वा दर्यावर्दी वारकरी भजन मंडळ खवणे दाजी जुवाटकर व सहकारी यांचे भजन, सायंकाळी ४ वा कोनीवाडी म्हापण यांचे भजन, सायंकाळी ६ वा ब्राह्मण वारकरी भजन मंडळ, पागेरेवाडी यांचे भजन, रात्री ८ वा विठ्ठल रखुमाई वारकरी भजन मंडळ म्हापण पंचक्रोशी (गोविंद राऊळ व सहकारी )यांचे भजन, रात्री ९.३० वा राऊळ व सहकारी मायनेवाडी यांचे भजन, 10:30 वा भवानी भजन मंडळ खडपीवाडी यांचे भजन, १२ वा गायक संदेश सामंत ( झाराप ) गायक दिवाकर पाटकर व सहकारी यांचे गायन, पहाटे ४ 30 वा श्री खोत वारकरी भजन मंडळ व सहकारी यांची काकडा आरती आणि त्यानंतर पारंपरिक रामदासी भजन आरती होऊन सकाळी सप्ताहाची सांगता होईल भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page