⚡बांदा ता.३१-: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या परिचारिका शांती कदम यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांचा आज बांदा ठाकरे शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
परिचारिका कदम या याठिकाणी २४ तास रुग्णसेवा करत होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेत ठाकरे सेनेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, भाऊ वाळके, ओंकार नाडकर्णी, राजन येडवे, विशू पावसकर, सुंदर गवंडी, राजदीप पावसकर, निखिल मयेकर, नागेश बांदेकर, जितू भिसे, ज्ञानेश्वर येडवे, गिरीश भोगले, अभिजीत देसाई, बंड्या बहिरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे परिचारिका शांती कदम यांचा सत्कार करताना ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
शांती कदम यांची प्रशासकीय बदली झाल्याने बांदा ठाकरे शिवसेनेच्या वतीने सत्कार…!
