⚡बांदा ता.३१-: बांदा परिसरातील स्वच्छतेला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बांदा च्या वतीने बांदा एसटी स्टँड येथे दोन नवीन कचराकुंड्या प्रदान करण्यात आल्या. बुधवारी हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष शिवानंद भिडे, खजिनदार सुदन केसरकर, तसेच क्लबचे सदस्य फिरोज खान, योगेश परळकर, विराज परब हे उपस्थित होते. यावेळी बांदा एसटी आगार व्यवस्थापक तसेच सावंतवाडी आगार व्यवस्थापक देखील उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून एसटी स्थानकावर स्वच्छता राखली जावी तसेच प्रवाशांनी कचरा इतरत्र न टाकता कचराकुंड्यांचा उपयोग करावा, असे आवाहन यावेळी रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
या उपक्रमामुळे स्थानिक प्रवासी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून रोटरी क्लबने यापुढेही सामाजिक उपक्रम राबविण्याचे आश्वासन यावेळी दिले.
फोटो:-
बांदा बसस्थानक येथे कचराकुंड्या प्रदान करताना बांदा रोटरी क्लबचे पदाधिकारी.