सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राला सक्शन मशीन प्रदान…

युवा नेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपयुक्त आरोग्य सुविधा उपलब्ध..

⚡सावंतवाडी ता.२९-:
युवा नेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आज सक्शन मशीन प्रदान करण्यात आली. ही मशीन आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरणार आहे.

या कार्यक्रमावेळी गेळे ग्रामपंचायतीचे सरपंच सागर ढोकरे, जिल्हा बँकेचे संचालक रविंद्र माडगावकर, पंढरी राऊळ, सांगेलीचे सरपंच लवू भिंगारे, मनिष परब, निहाल शिरसाट तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.

गावातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने आणि गावकऱ्यांच्या हितासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेला हा समाजोपयोगी उपक्रम नागरिकांकडून कौतुकास्पद ठरत आहे.

ग्रामीण आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ही मशीन महत्त्वपूर्ण ठरणार असून स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

You cannot copy content of this page