कुडाळ मधून संतोष वारंग २० जुलै पासून बेपत्ता…

⚡कुडाळ ता.२५-: येथील केळबाई मंदिर जवळ राहणारे संतोष परशुराम वारंग (50 ) हे 20 जुलैपासून बेपत्ता असल्याची खबर यांची पत्नी संजना वारंग यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.
श्री वारंग हे मुंबई येथे राहणारे आहेत. सध्या ते केळबाई मंदिर जवळ भाड्याने रहातात. 20 जुलै रोजी आपण मुंबई येथे जाऊन येतो असे सांगून ते घरातून बाहेर पडले ते अद्याप पर्यंत आले नसल्याची खबर पत्नीने पोलिसांमध्ये दिली आहे.
ते वर्णाने सावळे, सडपातळ, अंगात चॉकलेटी टी-शर्ट, ग्रे कलरची पॅन्ट असून त्यांची उंची 5.3 एवढी आहे. अधिक तपास श्री भोई करीत आहेत.

You cannot copy content of this page