अजित पवारांचा वाढदिवस सिंधुदुर्गात वृक्षारोपण आणि शैक्षणिक साहित्याच्या वाटपाने साजरा…

कणकवली, :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथील शाळा क्रमांक ५ मध्ये वृक्षारोपण करून, तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अल्पोपाहार देऊन हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे, २२ जुलै रोजी अजितदादांचा वाढदिवस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात साजरा करण्यात आला. कणकवली येथील कार्यक्रमात सौ. हुमेरा नाईक, सौ. कल्पना मलये आणि सौ. उज्ज्वला जावडेकर या महिलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना मलये यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार अजितदादांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात सामाजिक बांधिलकी जपून साजरा करण्यात येत आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सन्मान करणारे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत. वृक्षारोपण आणि वृक्षवाटप या कार्यक्रमांना आम्ही प्राधान्य देत आहोत. अजितदादांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्यासह कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, सौ. हुमेरा नाईक, मुख्याध्यापिका सौ. कल्पना मलये, सौ. उज्ज्वला जावडेकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे, शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, तालुका उपाध्यक्ष किशोर गावकर, वासिम फकीर, माजी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे, उदय सावंत, इम्तियाज फकीर, बाळू मेस्त्री, अंकुश मेस्त्री, जहीर फकीर, अंगणवाडी शिक्षिका सौ. स्वाती पोयेकर, सौ. केतकी दळवी, शिक्षिका सौ. शर्मिला चव्हाण, सौ. सोनाली जाधव, सौ. विशाखा धुमाले, सौ. सदिशा शिवगण, सौ. रसिका मिराशी, सुशील शिरसाठ, पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page