सावंतवाडी, ता. २२: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सावंतवाडी शहर भाजपने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले. या शिबिराचा शुभारंभ सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रक्तदातांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शेरवानी गावकर, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मनोज नाईक, दिपाली भालेकर, आनंद नेवगी दिलीप भालेकर, रवी मडगावकर, पंकज पेडणेकर,संजू शिरोडकर, संतोष राऊळ, मधुकर देसाई, जितू गावकर,हितेन नाईक, सविता टोपले, मेघना साळगावकर, बंटी जामदार, ज्ञानेश्वर पाटकर, आदी यावेळी उपस्थित होते.