⚡सावंतवाडी ता.२२-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखम राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रक्तदातांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शेरवानी गावकर, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मनोज नाईक दिपाली भालेकर, आनंद नेवगी दिलीप भालेकर, पंकज पेडणेकर, रवी मडगावकर, संजू शिरोडकर, संतोष राऊळ, मधुकर देसाई, जितू गावकर, हितेन नाईक, सविता टोपले, मेघना साळगावकर, बंटी जामदार, ज्ञानेश्वर पाटकर, आदी यावेळी उपस्थित होते.