⚡सावंतवाडी ता.२२-: कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे कदमवाडी येथील शोषित मुक्ती अभियान संस्था अंतर्गत सावली ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने नाग्या महादू निवासी वस्तीगृहातील मुलांना सावंतवाडी भाजपचे माजी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, यावेळी मुलांसोबत केक कापून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसही साजरा केला. यावेळी सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर आनंद नेवगी गुरु मटकर सुधाकर राणे आधी उपस्थित होते
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अजय गोंदावळे यांच्या माध्यमातून साजरा…!
