कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन सेंटरचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण…!

कणकवली – येथील उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे महाराष्ट्र शासन व क्रष्णा डायग्नोस्टीक यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सीटी स्कॅन सेंटरचे लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, डॉ. तुषार चिपळूणकर, डॉ. श्याम पाटील, अनिलकुमार देसाई, प्रशांत बुचडे, तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे, सिटीस्कॅन सेंटर चे हेड इजाद मुल्ला, टेक्निकल इन्चार्ज परशुराम कांबळे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मेघा गांगण, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, शहराध्यक्ष अण्णा कोदे, बंडू गांगण, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, विद्याधर तायशेट्ये, कळसुली सरपंच सचिन पारधीये, संजय कामतेकर, राजन परब, विजय चिंदरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page