कुडाळ लायन्स क्लबचे १९ ला पदग्रहण…

⚡कुडाळ ता.१८-: लायन्स क्लब ऑफ कुडाळ (सिंधुदुर्ग)च्या नूतन अध्यक्षपदी लायन आनंद कर्पे, सेक्रेटरी पदी लायन सीए. सागर तेली तर खजिनदारपदी लायन जीवन बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा उद्या शनिवार दिनांक 19 जुलै रोजी सायं. 6 वा. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
     लायन्स क्लब ऑफ कुडाळ – सिंधुदुर्ग या संस्थेची सन 2025-26 ची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. या कार्यकारिणीचा वार्षिक पदग्रहण सोहळा लायन्सचे उपप्रांतपाल (डिस्ट्रीक्ट 3234 डी -1) डॉ.किरण खोराटे यांच्या उपस्थितीत शनिवार 19 जुलै रोजी सायं. 6 ते 9 यावेळेत येथील महालक्ष्मी हॉलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नूतन अध्यक्ष श्री. कर्पे, सेक्रेटरी सीए. तेली, खजिनदार श्री. बांदेकर यांच्यासह नूतन कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य पदग्रहण करणार आहेत. यावर्षात लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. अशी माहिती नूतन अध्यक्ष श्री. कर्पे व सेक्रेटरी सीए. तेली यांनी दिली. या पदग्रहण सोहळयाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने करण्यात आले आहे. 

You cannot copy content of this page