अजयराज वराडकर:गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने स्वर पौर्णिमा हा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न..
⚡मालवण ता.१९-:
आज जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे. प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही अश्या वेळी योग्य मार्गदर्शन देऊन जीवनाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य गुरू करत असतो. गुरू हा कोणत्याही स्वरूपात असतो. त्यामुळे योगात्मा डॉ.काकासाहेब वराडकर यांनी दाखवलेल्या ज्ञानरूपी मार्गावरून जाताना यशाचे शिखर काबिज करू व हा अनमोल वारसा पुढे चालवूया असे प्रतिपादन
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.अजयराज वराडकर यांनी केले
कट्टा येथील वराडकर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने स्वर पौर्णिमा हा गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रम प्रसंगी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे सचिव श्री सुनील नाईक श्रीमती विजयश्री देसाई,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर,मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्याध्यापक श्री.ऋषी नाईक, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. महेश भाट, शालेय संसद उपाधीपती श्री. किसन हडलगेकर, सहा. उपाधीपती भूषण गावडे
आदी उपस्थित होते
या वेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे सचिव श्री सुनील नाईक यांनी गुरु विषयाचे महत्व विषद करताना परम पूज्य साटम महाराज व डॉ.काकासाहेब यांचा संदर्भ दिला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालेय संसदे मार्फत भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये प्रणव पडवळ,मधुर पेंडुरकर,सोहम मेस्त्री,गणेश नांदोसकर,वेदा मराठे,पूर्वी थवी,दिया नांदोसकर,श्लोक चांदरकर,यामिनी म्हाडगुत,वेदांत फोपळे यांच्या भक्तीगीतांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले. तसेच विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी संगीत साथ प्रशालेचे संगीत शिक्षक श्री. तेंडोलकर सर तसेच विद्यार्थी वेदांत फोपळे, आराध्य रेवंडकर, चिन्मय गोंधळी, व विघ्नेश गावडे यांनी दिली.
या कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी पालक हितचिंतक उपस्थित होते.