दोन संयुक्त दशावतारी नाटकांची मेजवानी:महोत्सवाचे यंदाचे तेरावे वर्ष..
⚡कुडाळ ता.१८-: दशावतारी नाट्य रसिकाना उत्कंठा लागून राहिलेला कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपचा ‘मान्सून महोत्सव- 2025 ‘ येथील सिद्धिविनायक सभागृहत ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे तेरावे वर्ष आहे. यात दशावतार लोकलेतील आघाडीच्या निवडक कलाकारांच्या संचात ३१ जुलै रोजी ‘महायोद्धा इरावन’, तर १ ऑगस्ट रोजी ‘थाळीहरण’ नाटक होणार आहे.
दरवर्षी दर्जेदार दशावतारी नाटके हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. सन 2012 पासून या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. या महोत्सवात आतापर्यंत ‘वीर अभिमन्यू’, ‘द्रौपदी वस्त्रहरण’, ‘सती चंद्रसेना’, ‘लव-कुश’, ‘भीष्म प्रतिज्ञा’, ‘अश्विनी उद्धार’, ‘नंदी संग्राम’, ‘कृष्ण-सुदाम भेट’, ‘वीर बब्रुवाहन’, ‘प्रतिकृष्ण’, ‘दक्षयज्ञ’, ‘इंद्रजीत वध’, ‘उषा स्वप्न बाणासूर’, ब्रह्मतेज, इंद्रभक्त इंद्रभानू,महारथी कर्ण अशी एकापेक्षा एक नाटके सादर करण्यात आली आहेत.
यावर्षी ३१ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता संयुक्त दशावतार कलाकारांच्या संचात
‘महायोद्धा इरावन’ नाटक होणार आहे. यात गणपती – प्रतिक कलिंगण, इरावन – दत्तप्रसाद शेणई, विंध्य –
सागर गावकर, उलुपी – सुधीर तांडेल, अश्वसेन- महेंद्र कुडव, कृष्ण – नारायण आसयेकर, अर्जुन – मोरेश्वर सावंत, मोहिनी- गोट्या ऐरागी , दृष्टधूम -उदय मोर्ये, दुर्योधन – सुहास माळकर , शकुनी – गौरव शिर्के, प्रशांत मयेकर , इंद्र – केशव खांबल व गवाक्ष – सुयश ठाकूर या कलाकारांचा समावेश आहे. हार्मोनियम – मयूर गवळी, पखवाज- खंदारे, झांज – हरेश नेमळेकर यांची संगीतसाथ आहे. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता संयुक्त दशावतार मंडळाच्या संचात ‘थाळीहरण’ नाटक होणार आहे. यात गणपती- प्रतिक कलिंगण, दुर्योधन- दत्तप्रसाद तवटे, दुःशासन – दाजी सावंत, जयंद्रथ – संजय काळे, शकुनी सुनील खोर्जूवेकर , दु:शीला – यश जळवी, धर्म – आनंद नार्वेकर, अर्जुन – साहिल तळकटकर, कृष्ण – बबलू मेस्त्री, द्रौपदी – नितीन घाडीगावकर व ब्रह्मराक्षस – रोहित नाईक आदी कलाकार आहेत. हार्मोनियम – अमोल मोचेमाडकर, पखवाज – अर्जुन सावंत ,झांज – विनायक राऊळ यांची संगीतसाथ आहे.
या नाटकांसाठी श्री कलेश्वर दशावतार मंडळ (सुधीर कलिंगड प्रस्तुत, नेरूर) यांचे विशेष सहाय्य लाभणार आहे. नाट्य रसिकांनी याचा आनंद लुटावा,असे आवाहन लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर व या ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर तसेच ग्रुप सदस्यांनी केले आहे.