10 मे पर्यंत असेच सहकार्य करा ; नगराध्यक्ष नलावडे यांचे आवाहन
*💫कणकवली दि.०२-:* कणकवली बाजारपेठेसह शहरातील मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व दुकाने जनता कर्फ्युच्या दुसऱ्या दिवशीही बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील वाढती कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी 1 मे ते 10 मे दरम्यान जनता कर्फ्युच्या आवाहनाला कणकवलीवासीय व्यापाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी सक्रिय पाठिंबा दिला आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी 10 मे पर्यंत जनता कर्फ्यु पाळून सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
