चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांनी अलर्ट राहावे…

ठाकरे शिवसेनेची मागणी; पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना निवेदन…

⚡सावंतवाडी ता.१२-:

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री अमोल चव्हाण यांना शहरातील उपयोजनेबाबत निवेदन देण्यात आले.
यात सावंतवाडी शहरात दोन दिवसापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी पोलीस खात्याने तातडीचे उपाययोजना करणे आवश्यक आहे या चोरीच्या घटनेत चोरट्यांकडे हत्यारे आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर आहे कारण विरोध झाल्यास त्यांनी हल्ला केला असता. सावंतवाडी हे शांत संस्कृत आणि समृद्ध राजकीय वारसा असलेले शहर आहे अशा घटनांमुळे शहराच्या प्रतीमेला काळीमा फासली जात आहेत यावेळी भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी खालील मागण्या करण्यात आले आहेत.
यामध्ये शहराच्या सर्व सीमा मुख्य चौक दाट वस्ती आणि सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत रात्री 12 ते 6 सहा या कालावधीत प्रत्येक तासाला पोलिसांची गस्त व्हावी सर्व परप्रांतीय कामगार आणि भाडेकरूंची पोलीस ठाण्यात नोंदणी अनिवार्य करावी संशयस्पद हालचाली किंवा गैरप्रकार आढळल्यास नागरिकांना विशेषतः जेष्ठ नागरिकांना त्वरित संपर्क साधता यावा यासाठी हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध करून तो प्रत्येक घरात उपलब्ध करावा अथवा चौकाचौकात प्रसिद्धी फलक लावण्यात यावेत ज्येष्ठ नागरिकांसह सर्व नागरिकांना सुरक्षा उपायांची माहिती देण्यासाठी वेळोवेळी जागरूकता सभा घ्याव्यात आणि संभाव्य घटनांमध्ये खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे सावंतवाडी शहरातील लॉजिंग मध्ये उतरणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवण्याबाबत व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याबाबत पोलीस स्टेशनची त्वरित संपर्क साधण्याचा सूचना लॉजिंग हॉटेल मालकांना देण्यात यावा सदर उपायोजना त्वरित अंमलबजावणी करून शहरातील नागरिकांच्या सुरक्षतेची रक्षण व्हावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शहर संघटक निशांत तोरसकर, शहरप्रवक्ते आशिष सुभेदार शहर प्रमुख शैलेश गौंडळकर महिला शहर संघटक सौ समीरा खलील, उपशहर प्रमुख शेखर सुभेदार, शाखा प्रमुख अमोल सारंग, जावेद शहा.

You cannot copy content of this page