⚡वेंगुर्ला ता.०८-: वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनातील अनमोल परंपरा आहे. ‘वारी‘ ही श्रद्धा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारी चळवळ आहे. ही परंपरा केवळ देवाच्या दर्शनापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. याच परंपरेच्या सन्मानार्थ भाजपा सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘सन्मान वारक-यांचा‘ या विशेष कार्यक्रमांतर्गत २५ ज्येष्ठ वारक-यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम चांदेरकर विठ्ठल मंदिरात संपन्न झाला.
सन्मान केलेल्यांमध्ये ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा, किशोर रेवणकर, गोविद परब, दाजी सावंत, अंकुश वराडकर, लता खोबरेकर, प्रमिला टांककर, रजनी वराडकर, शंकुतला कुर्ले, लक्ष्मी तांडेल, ज्योत्स्ना कुबल, गुणवंती परब, चंदना कुर्ले, सुप्रिया बांदेकर, दूर्वा कुबल, महेंद्र पालव, लता मसुरकर, केसरी खवणेकर, सहदेव गिरप, सुजाता कुर्ले, विठ्ठल वेंगुर्लेकर, श्रीमती मयेकर, सौ.तांडेल, सौ.गिरप यांचा समावेश आहे. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, अॅड.सुषमा खानोलकर, पपू परब, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, सुजाता पडवळ, वसंत तांडेल, श्रेया मयेकर, रसिका मठकर, अभिषेक
वेंगुर्लेकर, वैभव होडावडेकर, हेमंत गावडे, मनोहर तांडेल, हितेश धुरी, सत्यविजय गावडे, रविद्र शिरसाट, प्रमोद गोळम, अरूण ठाकूर, प्रभाकर गावडे, भाऊ केरकर, कृष्णा पेडणेकर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – सिधुदुर्ग भाजपातर्फे ज्येष्ठ वारक-यांचा सन्मान करण्यात आला.