परेश बांदेकर:परेश बांदेकर यांनी दिली यूपीएससी परीक्षेबाबत माहिती;निखिल खानोलकर यांनी शेअर केला आपला यूपीएससीचा अनुभव..
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यूपीएससी स्पर्धा परीक्षा संस्कृती निर्माण झाली पाहिजे. ती निर्माण करूयात. त्यासाठी येथील विद्यार्थी यूपीएससी परीक्षेकडे वळले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आमच्याकडून नेहमीच दिले जाईल अशी माहिती अकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे परेश बांदेकर यांनी दिली. कुडाळ येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यूपीएससी म्हणजे काय, त्याचा इतिहास, सिंधुदुर्गातील विद्यार्थी यात कसे येतील याविषयी श्री. बांदेकर आणि निखिल खानोलकर यांनी माहिती दिली.
अकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे परेश बांदेकर यांनी मंगळवारी सायंकाळी हॉटेल लाइमलाईट येथे पत्रकार परिषद घेऊन यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याविषयी माहिती दिली. यावेळी इंजिनियर निखिल खानोलकर आणि विवेक देसाई उपस्थित होते. यावेळी बोलताना परेश बांदेकर यांनी यूपीएससीचा इतिहास सांगितला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी यूपीएससीची स्थापना केली. हे करत असताना त्यांनी संपूर्ण देशांचा विचार केला. देशाला लागणारे तज्ज्ञ प्रशासक या माध्यमातून तयार करण्याची ती संकल्पना होती. यामध्ये ३० टक्के अधिकारी स्थानिक प्रदेशात काम करतील तर सत्तर टक्के अधिकारी देशपातळीवर काम करतील असा फॉरमॅट होता, असे श्री. बांदेकर म्हणाले.
श्री. बांदेकर पुढे म्हणाले, अजूनही यूपीएससी, एमपीसीसी यांची पुरेशी कल्पना विद्यार्थ्यांना नाही. विद्यार्थी-पालक यांच्यामध्ये अजून याबाबत जागृती नाही. ती झाली पाहिजे. आज ज्या प्रमाणे उत्तर प्रदेश, बिहार येथून विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा देतात आणि अधिकारी होतात ते अजून आपलीकडे होताना दिसत नाही. पण आता याबाबतचे मार्गदर्शन अकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन या संस्थेमार्फ़त कुडाळ मध्ये दिले जाणार असल्याचे श्री. बांदेकर यांनी सांगितले. त्याच बरोबर एनडीए आणि सीडीएस बाबतचे मार्गदर्शन सुद्धा दिले जाणार आहे. चार प्रकारे हे मार्गदर्शन केले जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने हे मार्गदर्शन दिले जाईल. त्याच बरोबर हॉस्टेलची सुविधा असेल. त्यामुळे विद्यार्थ्यंना आठ तास अभ्यास करता येईल. त्याच्या खोलीची सुद्धा साफसफाई केली जाईल. त्या दरम्यान चहा, नाश्ता, जेवण सुद्धा दिले जाईल. यामागचा हेतू फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे एवढाच असल्याचे श्री. बांदेकर म्हणाले.
यावेळी एअरोनॉटिकल इंजिनियर निखिल खानोलकर यांनी देखील आपला यूपीएससीचा अनुभव सांगितला. यूपीएससीला जॉब समजू नका तर ते एक देशसेवेचे व्रत आहे असे समजून अभ्यास करा, असे आवाहन निखील खानोलकर यांनी केले. यूपीएससी हा असा मार्ग आहे जो वापरून तुम्ही देशसेवा करू शकता. युपीएससी मुळे तुम्हाला अनेक विषय समजतात. त्यासाठी त्या प्रकारे तयारी करावी लागते. मुंबई, दिल्ली येथे लाखो रुपये देऊन यूपीएससी करण्यासाठी मुले जातात. पण आता सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अशाप्रकारचे मार्गदर्शन मिळू शकते, असे श्री. खानोलकर यांनी सांगितले.
आपल्या जिल्हयांतील विद्यार्थी एसएससी, एचएससी बोर्डात राज्यात अव्वल येतात पण ती स्पर्धा परीक्षांत कुठे दिसत नाहीत, याविषयी बोलताना श्री. खानोलकर म्हणाले, आपला अभ्यासक्रम हा सिबीएससी, एनसीईआरटीच नसतो. हाच सीबीएससी आणि एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर युपीएससीचा अभ्यासक्रम आधारलेला असतो. त्यामउळे तिथे आपली मुले कमी पडतात, असे श्री खानोलकर यांनी सांगितले. त्याचबरोबर आपल्याकडे मुले आणि पालक यांच्यामध्ये यूपीएससी बाबत जागरूकता नाही. या उलट युपी,बिहार मध्ये प्राथमिक शिक्षणापासून त्यांचे यूपीएससी करायचे हे ठरलेले असते. त्यामुळे जी जागरूकता निर्माण करण्याचे काम अकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हि संस्था नक्की करेल असा विश्वास श्री. खानोलकर आणि श्री. बांदेकर यांनी यावेळी व्यक्त केला.