आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा २५ जून रोजी होणार सन्मान…

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन..

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: : सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारावास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा बुधवार, २५ जून, २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

      देशात सन १९७५ ते १९७७  मध्ये लागलेल्या आणीबाणी कालावधीत लढा देताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्तींनी सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला आहे. या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देवून यथोचित गौरव करण्याचे शासनाने ठरविले आहे. जिल्ह्यातील या व्यक्तींचा बुधवार, २५ जून, २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता  जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे सन्मान जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आणीबाणीतील गौरवमुर्तींचे चित्रप्रदर्शन
या कार्यक्रमाच्यावेळी जिल्ह्यातील आणीबाणीत कारावास भोगलेल्या गौरवमुर्तींवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा माहितीकार्यालयाच्या वतीने करण्यात आले असून या प्रदर्शनाचाही लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००

You cannot copy content of this page