शिवसेना मालवण तालुका प्रवक्ते पदी निलेश बाईत यांची नियुक्ती…

मालवण दि प्रतिनिधी :
शिवसेना मालवण तालुका प्रवक्ते पदी निलेश बाईत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी निलेश बाईत यांना सुपूर्द करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, हिंदूहृदय् सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवससेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना मालवण तालुका प्रवक्ते पदी निलेश बाईत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदुत्वाचा विचार आणि शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल व शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम कराल असा विश्वास नियुक्ती पत्राच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, शहर प्रमुख दीपक पाटकर, प्रशांत परब, बबन परब, प्रकाश कासले, मंगेश यादव, जयन घाडीगावकर, राजू बुवा घाडीगावकर, दाजी घाडीगावकर, यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page