संजू परब; आगार प्रमुखांची घेतली भेट
⚡सावंतवाडी ता.२४-: रोणापाल येथे एसटी आणि दुचाकीत झालेल्या अपघातात गंभीर झालेल्या दुचाकीस्वाराला एसटीकडून मदत मिळावी यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आगार प्रमुखांची भेट घेतली. जखमी गणेश गावडे (वय २५) याला गोवा-बांबोळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची घरची परिस्थिती हालाखीची असल्याने प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळावी यासाठी श्री. परब यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत लक्ष वेधले.
दरम्यान, ही नुकसान भरपाई जास्तीत जास्त मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासने यावेळी आगार प्रमुखांनी दिले. यावेळी ही रक्कम दोन टप्प्यात मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी संजू परब यांनी केली. आपण जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासने अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी संजू परब यांच्यासोबत ग्रामस्थ देखील उपस्थित होते.