⚡मालवण ता.२१-:
मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिर आणि जि. प. प्राथमिक शाळा रेवतळे यांच्यातर्फे जागतिक योग दिन रेवतळे शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक श्री. देविदास प्रभूगांवकर यांनी ‘एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग’ हे घोषवाक्य घेऊन योगाचे महत्व मुलांना सांगितले. तसेच मुलांकडून विविध योगासने करून घेतली.
या योगासन कार्यक्रमात शिवाजी वाचन मंदिरचे उपाध्यक्ष श्रीधर काळे, सदस्य रत्नाकर कोळंबकर कर्मचारी सौ. मानसी दुधवडकर, साक्षी सावंत संतोष कोचरेकर तसेंच शिक्षण विस्तार अधिकारी उदय दिक्षित, संस्था अध्यक्ष श्री. निलेश शिरोडकर, शिक्षण सेवक हिना बागवान यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीधर काळे यांनी पतंजलीचा श्लोक सांगून त्याचा मुलांना अर्थ सांगितला तसेच सर्वांचे आभार मानले.