पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार:गावातील निराधार महिलांचा सन्मान, भेट वस्तू देत केला सत्कार..
कणकवली : राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कलमठ भाजपा वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असून कलमठ गावात एक आठवडा सामाजिक कार्यक्रम होणार आहेत.
काल कलमठ गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी पोषण आहाराचे नियोजन करण्यात आले होते. आज कलमठ श्री काशीकलेश्वर सभागृहात गावातील निराधार महिलांचा सन्मान करत भेट वस्तू देण्यात आल्या. उद्या सकाळी गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून, जेष्ठ नागरिकांचे आरोग्य शिबिर, सफाई कर्मचारी सत्कार, वायरमन सत्कार, ग्रामदेवता श्री कलेश्वर मंदिरात अभिषेक अश्या प्रकारे आठवडाभर उपक्रम कलमठ भाजप वतीने आयोजित करण्यात आले आहेतं. आज गावातील निराधार महिलांचा सन्मान करण्यात आला. तरी १७रोजी २२० विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आला. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, नितीन पवार, निसार शेख, अनुप वारंग, तेजस लोकरे, पपू यादव, सचिन खोचरे, दिनेश गोठणकर, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, आबा कोरगावकर, परेश कांबळी, गुरू वर्देकर, तेजस लोकरे, श्रेयस चिंदरकर, अमजद शेख, शेखर पेंढरकर, अभी गुरव, संजय गुरव, समर्थ कोरगावकर , प्रथमेश धुमाळे उपस्थित होते.