पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजपचा गौरव कार्यक्रम सावंतवाडीत संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.२०- : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षांचा कार्यकाळ यशस्वी रित्या पूर्ण केला. यासाठी सावंतवाडी शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ११ वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.

सावंतवाडी शहर भाजपच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, ज्येष्ठ नेते पुखराज पुरोहित, माजी नगरसेवक आनंद नेवगी, महिला अध्यक्षा मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर, अँड. संजू शिरोडकर, अजय गोंदावळे, राजू बेग, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, मिसबा शेख, मेघना साळगावकर , सुमित वाडकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page