बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आमच्या कामगार संघटना सिंधुदुर्गात काम करणार-घनश्याम नाईक…

कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची तयारी;हिंद भारतीय जनरल कामगार सेना व महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना जिल्ह्यात काम करेल…

*💫कणकवली दि.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता औद्योगिक उभारणी होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मालगाड्या येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कामगारांना संघटित करून न्याय देण्याच्या दृष्टीने निलेश उर्फ आप्पा पराडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या दोन संघटना कार्यरत आहेत.त्यानुसार हिंद भारतीय जनरल कामगार संघटना व माथाडी कामगार संघटना सिंधुदुर्गात काम करणार आहेत.अधिकृतपणे जिल्ह्यातील पदाधिकारी आता कामाला सुरुवात करणार आहेत,अशी माहिती सरचिटणीस घनश्याम नाईक यांनी दिली. कणकवली येथील कामगार संघटनेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू शेट्ये, जिल्हा सरचिटणीस रिमेश चव्हाण ,अपर्णा कोठावळे, तालुकाध्यक्ष वैभव मालंडकर , राजू राठोड ,योगेश दळवी, संकेत पांगम, बाळा दळवी , प्रेमानंद नाईक,मिलिंद नाईक,प्रशांत कोठावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. हिंद भारतीय जनरल कामगार सेना व माथाडी कामगार ल संघटनांचे महाराष्ट्रात ५० हजार सभासद आहेत. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही संघटनांची जबाबदारी अध्यक्ष निलेश-उर्फ आप्पा पराडकर यांच्यावर दिली आहे. त्यामुळे या संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर औद्योगिक क्षेत्रात व विविध मालवाहतूक करत असलेल्या प्रभाग क्षेत्रांमध्ये मजबूत संघटन उभं करून त्या माध्यमातून शिवसेनेला ताकद देण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे. सिंधुदुर्गातही त्याच धर्तीवर कामगार संघटना या माध्यमातून कामगारांना न्याय देतील. त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने त्या कामगारांचे संघटन केले जाईल.बाहेरुन येऊन काही लोक मिळणारा रोजगार हिरावून घेत आहेत.त्या विरोधात पुढील काळात आमच्या संघटना आवाज उठवतील. अनेक मालगाड्या उतरवण्यासाठी बाहेरील कामगार घेऊन येत आहेत.ते स्थानिक माथाडी कामगारांना काम मिळावे यासाठी ही काम करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांना कामगार कायद्यानुसार किमान वेतन व विविध सुविधा मिळालाच पाहिजेत .त्यासाठी संबंधित कंपन्या व त्या मालकांची संवाद साधण्याची भूमिका आमच्या संघटनेचे पदाधिकारी करतील.छोट्या मोठ्या कंपन्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्या ठिकाणी असलेल्या कामगारांना न्याय मिळत नसेल तर न्याय देण्याची भूमिका आमची संघटना बजावेल,असा इशारा घनश्याम नाईक यांनी दिला आहे. आमच्या हिंद भारतीय कामगार सेना व महाराष्ट्र माथाडी कामगार सेना संदर्भात सिंधुदुर्गात काम करत असताना काही चर्चा उठल्या होत्या. यासंदर्भात शिवसेना खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना आमदारांची संयुक्त बैठक आमच्या अध्यक्ष निलेश स्वरूपा पराडकर यांच्या उपस्थितीत झाली आहे.काही पदाधिकाऱ्यांना आमचा संघटनात्मक बांधणीमुळे करत असताना अस्तित्वाबाबत भीती वाटली होती. हिंद भारतीय जनरल कामगार सेना व माथाडी कामगार संघटना या शिवसेना प्रणित आहेत.तसा कोणताही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. आप्पा पराडकर हे शिवसेनेचे निष्ठावंत आहेत. उद्धव ठाकरे यांनीच त्यांना कामगार संघटनांची जबाबदारी दिलेली आहे. ही शिवसेनेची अंगिकृत संघटना असल्यामुळे कुठलेही मतभेद नसतील असा विश्वास घनश्याम नाईक यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page