⚡सावंतवाडी, दि १४-: पावसाळी शेतीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकऱ्यांना शेती व पिकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवाजी कृषी विद्यापीठ किर्लोस ओरोस येथील प्रशिक्षणार्थी विद्या चौगुले व ग्रुप आणि इतर विद्यार्थिनी साळगांव, पवारवाडी तालुका कुडाळ येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमास दिनाक १३ जून २०२५ रोजी प्रारंभ केला आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यता प्राप्त असलेल्या छत्रपती कृषी विद्यापीठाचे विद्या चौगुले, साक्षी रावत, सलोनी मयेकर, वेदिका नाईक, जुगुनु नजीर या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.यावेळी शेतीपूरक बियाणी, नवनवीन तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची दखल घेत उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी साळगांव सरपंच अनघा दळवी, उपसरपंच दत्तप्रसाद साळगांवकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सदस्य श्वेता लंगवे व इतर मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी कृषी विद्यापीठ किर्लोस ओरोस येथील प्रशिक्षणार्थी विद्या चौगुले व ग्रुप आणि इतर विद्यार्थिनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन…
