आ केसरकर यांच्या स्थानिक निधीतून उपजिल्हा रुग्णालयातील विंधन विहीर …

रुग्ण कल्याण समिती सदस्य देव्यां सूर्याजी यांचा पाठपुरावा..

सावंतवाडी : आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२५-२६ मधून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी विंधन विहीर मंजूर केली आहे. यासाठी रूग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी तथा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी पाठपुरावा केला होता. आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे‌.

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे पाण्याचा तुटवडा मोठ्याप्रमाणात गेली बरीच वर्षे होता.भर उन्हाळ्यात हा प्रश्न अधिक जटील बनायचा व उपचार घेत असलेल्या रुग्णांचे हाल होत. यामुळे रूग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य देव्या सुर्याजी यांनी माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच लक्ष वेधलं होत. या पाठपुराव्यास यश आले असुन आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत मतदार संघातील विकास कामे घेण्यात यावी असे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे‌. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयात विंधन विहीर चे लवकरच काम करण्यात येणार असून यासाठी आम. दीपक केसरकर यांचे रूग्ण कल्याण नियामक समितीकडून श्री. सुर्याजी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील व वैद्यकीय अधीक्षक श्री ज्ञानेश्वर ऐवळे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page