कळसुली गवसेवाडी येथील ज्येष्ठाचा ओढ्यात सापडला मृतदेह…

कणकवली : गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले कळसुली – गवसेवाडी येथील महेश दिनकर देसाई (५२) हे गुरुवारीच रात्री १० वाजण्याच्या सुमारास गवसेवाडी येथीलच ओढ्याच्या पाण्यामध्ये मृतावस्थेत आढळून आले. महेश ओढ्यामध्ये कसे पडले, हे समजून शकलेले नाही महेश हे शेतकरी होते. ते गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीय व ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते. अखेरीस रात्रीच्या सुमारास ते ओढ्याच्या पाण्यात मृतावस्थेत आढळले. महेश यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. महेश यांना शोधण्यासाठी कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये, ग्रामस्थ आनंद देसाई, विजय देसाई, पंढरी देसाई, आत्माराम नार्वेकर, बाळा कदम, पोलीस पाटील महेश केसरकर आदींनी प्रयत्न केले. घटनास्थळी नायब तहसीलदार यादव यांनीही भेट दिली होती

You cannot copy content of this page