⚡सावंतवाडी ता.०५-: पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी भाजपतर्फे आज माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी येथील श्री देव ब्राम्हण देवस्थान परिसरात वृक्षारोपण करुन पर्यावर दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका दिपाली भालेकर,भैय्या सावंत, गौरव रामाने, भार्गव धारणकर, संतोष खंदारे, अभिनंदन राणे, संदेश मोर्ये, उल्हास सावंत,संजय सावंत, उज्वला सावंत, धन्यवी शृंगारे,कुणाल शृंगारे, मिसबा शेख, ज्योती मुद्राळे, मेघना साळगावकर,मेगा भोगटेम साईनाथ जामदार,अदिती सामंत, आधी उपस्थित होते
आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी, तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांनी ‘एक माणूस, एक झाड’ ही संकल्पना पुढे नेण्याचे आवाहन केले.
या उपक्रमामुळे केवळ पर्यावरण दिन साजरा झाला नाही, तर भावी पिढ्यांसाठी हिरवळ टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी, असा सकारात्मक संदेश सर्वत्र पोहोचला.
