⚡बांदा ता.०१-: बांदा वाफोली रस्त्यावर पाटकर पुलाजवळील रस्त्याचे आज डांबरीकरण करण्यात आले. अचानक पाऊस सुरु झाल्याने या रस्त्याचे डांबरीकरण रखडले होते. येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी सदरचे काम आज स्वतः पुढाकार घेत पूर्ण केले.
याठिकाणी रस्त्याचे काम करताना मातीचा भराव टाकून उंची वाढविण्यात आली आहे. रस्त्याचे काम सुरु असतानाच अचानक अवकाळी पाऊस सुरु झाला. पाऊस सतत सुरु असल्याने रस्त्याचे काम थांबविण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर चिखल झाला. आज पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा कामास प्रारंभ करण्यात आला.
आज दिवसभरात रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. यावेळी स्वतः संजय आईर यांनी थांबून काम करून घेतल्याने स्थानिकातून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो:-
बांदा वाफोली रस्त्याचे डांबरीकरण आज करण्यात आले.
बांदा वाफोली रस्त्यावर पाटकर पुलाजवळील रस्त्याचे डांबरी करणला अखेर सुरुवात…!
