९९. ३९ टक्के लागला मालवण तालुक्याचा निकाल…

⚡मालवण ता.१३-:
दहावी परीक्षेसाठी मालवण तालुक्यातील एकूण ९८७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९८१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९९. ३९ टक्के लागला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये ४६४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी तर ३६१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकावली आहे. तसेच १४० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मालवण तालुक्यातील ३४ शाळांपैकी ३० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

मालवणच्या अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलच्या आर्या अजित राणे व श्रेयस चंद्रशेखर बर्वे यां दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवीत मालवण तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावीला आहे. तर कट्टा येथील वराडकर हायस्कुलची विद्यार्थिनी हर्षदा किसन हडलगेकर हिने ९९. ४४ टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक आणि वराडकर हायस्कुल कट्ट्याची श्रेया समीर चांदरकर हिने विद्यार्थ्याने ९८. ४० टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकावीला आहे.

You cannot copy content of this page