कळसुली येथील श्री. स्वामी समर्थ मठाचा १४ व १५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा…

कणकवली: प्रेम दया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी (रजि) सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. हनुमंत सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन सोहळा बुधवार १४ मे आणि गुरुवार १५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.

विविध धार्मिक कार्यक्रम खालीलप्रमाणे – बुधवार १४मे रोजी सकाळी ५:३० वा. नित्यपूजा, सकाळी ६ वा. पुन्हाहवाचन, सकाळी ६.४५वा.अभिषेक, पूर्व पूजा, दुपारी १२.३० वा. उत्तरांग पूजा, दुपारी १ वाजता नामस्मरण, महाआरती, नैवेद्य, तीर्थप्रसाद, दुपारी ३ वा. ग्रंथवाचन, सायं.५ वा. लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ,सायं. ७ वा. स्थानिक भजने, गुरुवार १५ मे रोजी सकाळी ४: ३०वा. काकड आरती, सकाळी ५:३० वाजता नित्यपूजा, सकाळी ६.३० वा. पूर्वांग पूजा, सकाळी ७ वा. महारुद्र, अभिषेक, दुपारी १२.३० वा. उत्तरांग पूजा, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी १.३० ते ३ वा. महाप्रसाद, सायं.४ वा. ग्रंथवाचन, सायं.५: ३० वा. पालखी मिरवणूक, सायं.७ वा. महाप्रसाद, सायं.७.३० वा. स्थानिक भजने, रात्रौ १० वा. श्री. बोर्डेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग यांचा दशावतारी नाट्य प्रयोग ” अंग विरहित स्त्री “असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

तरी स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रेमदया प्रतिष्ठानचे श्री.अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page