डॉ.महेश जाधव: आंबोलीत भीम जयंती उत्साहात..
आंबोली,ता.१२: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शाचा बोध घेऊन वाटचाल जीवनात करणे आवश्यक आहे.त्यांनी बालपणी शाळेत बसण्यापासून अनेक गोष्टीत समाजिक मागासलेपणा अनुभवला.त्यांनी बुद्धी च्या अलौकिक जोरावर अनेक पदवी संपादन केल्या.त्यांनी त्याग करून देशप्रती समर्पण केले.त्यांची फक्त जयंती पुण्यतिथी इथपर्यंत न राहता रोजच्या जीवनात प्रेरणा घ्यावी.देशात अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहत आहेत.एवढी प्रगल्भ अलौकिक बुद्धिमत्ता त्यांची होती त्यामुळे भारतीय राज्यघटना आज सर्वश्रेष्ठ आहे त्यावर आज देश चालत आहे,स्त्रियांना हक्क मिळवून दिले त्यामुळेच आज अनेक क्षेत्रात पुढे आहेत असे प्रतिपादन आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश जाधव यांनी बुद्ध जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती कार्यक्रमात केले. आंबोली रमाईनगर येथे बुद्ध जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रम करण्यात आला.याकार्यक्रमासाठी अध्यक्ष राजाराम गुरव,प्रमुख पाहुणे डॉ.महेश जाधव,आंबोली पोलीस हवालदार लक्ष्मण काळे, हवालदार मनीष शिंदे,रामचंद्र अमृस्कर,शंकर गावडे,समाजिक कार्यकर्ते मायकल डीसोझा, वामन पालेकर,ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,दीपक मेस्त्री,अनिल चव्हाण,माजी सैनिक बाळकृष्ण गावडे,मनोहर जाधव,नाना(प्रकाश) जाधव,अनिल मेस्त्री,हेमंत कर्पे, एन आय आय टी फौंडेशन पुणे च्या कम्यूनिकेटर ट्रेनर सायली मुंज, दिव्या जाधव तसेच रमाईनगर येथील सर्व जन उपस्थित होते.यावेळी मान्यवारांच्या हस्ते गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतिज्योती सावित्री फुले,ज्योतिबा फुले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्योलन करण्यात आले. यावेळी निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा तसेच विविध गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचा सत्कार बक्षीस देऊन करण्यात आला.यावेळी माजी सैनिक बाळकृष्ण गावडे म्हणाले,समाजातील विषमता,अन्यायाची चिड समाजिक स्तिती यातून बोध घेऊन बाबासाहेबांचे व्यक्तिमत्च घडत गेले.प्रगल्भ बुद्धीने त्यांचे जगात नाव झाले त्यांच्या बुद्धीवर आज देश चालत आहे.त्यांचे कार्य महान आहे.यावेळी राजाराम गुरव यांनी भीम जयंती निमित्त भाषण केले. आंबोली पोलीस हवालदार मनीष शिंदे यांनी व्यसनाधिनता यावर भाष्य केले. डॉ.बाबासाहेबांच्या विचाराचा बोध घेऊन तरुणांनी वाटचाल केली पाहिजे. कायद्याचे राज्य सुसंस्कृत समाज निकोप समजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे त्यासाठी तरुणांनी बदल करणे आवश्यक आहे.यावेळी सायली मुंज यांनी सोशल मीडिया आणि समाज माध्यमातून फसवणुकीवर मार्गदर्शन केले. पॉलिसी,चैन मार्केटिंग,शेअर मार्केट,बँक ओटीपी,इंस्टाग्राम,अकॉउंट लिंक साईड,फॉलोवर्स वाढवणे यामागे एक टीम वर्क करून ओटीपी मागून किंवा बँक मधून बोलतो अशी फसवणूक करून माहिती घेऊन फसवणूक केली जाते.आर्थिक फसवणूक,तसेच शारीरिक,मानसिक फसवणूक प्रकार वाढले आहेत.आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये.बँकेत स्वतः जावे.ओटीपी देऊ नये.कागदपत्र त्या कामासाठी खातेीशीर वापरवे.सायबर शाखे ची तात्काळ मदत घेतली पाहिजे.एनाआय् आय टी या संस्थे मार्फत जिल्ह्यात वंचितभागात जागरूकता तसेच संगणक शिक्षण देण्याचे काम करणार असल्याचे सौ.मुंज यांनी सांगितले. रमाईनगर येथून बाजारवाडी पर्यंत रॅली काढण्यात आली.संध्याकाळी संस्कृतिक कार्यकम होणार आहेत.