मळगाव येथे पहिल्यांदाच धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा…

१४ मे रोजी मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने आयोजन..

सावंतवाडी : मळगाव येथे पहिल्यांदाच १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या पटांगणावर या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यनिमित्त सकाळी ९.०० वाजता छत्रपती संभाजी महाराज प्रतिमा पूजन, त्यानंतर इच्छुक मुलांसाठी चित्रकला आणि रांगोळी, सायंकाळी ६.०० वाजता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष मंगेश पाटील यांचे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर व्याख्यान आदी कार्यक्रम होणार आहेत. श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शिवकालीन पुरातन वस्तुंचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी कोणाला देणगी स्वरूपात मदत करायची असेल त्यांनी सुनील राऊळ-९६३७८२६३१५, गजानन राऊळ-९४०३५६१४२९, ज्ञानेश्वर राणे-७५८८५७०५१२ व रितेश राऊळ-८७८८८७६१७३ यांच्याशी संपर्क साधावा. मळगाव तसेच परिसरातील शिवशंभू प्रेमींनी श्री छत्रपती संभाजी महाराज जमोत्सवानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा व शिवकालीन वस्तू प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page