सावंतवाडी : श्री देव कलनाथ, पूर्वीदेवी चा १२ मे रोजी वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
सकाळी ९.०० वा. श्री कलनाथ, पूर्वीदेवी चरणी महाअभिषेक, सकळी १०.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. महाआरती, सामुदायिक गा-हाणे, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायं. ७.३० वा. स्थानिक भजने, रात्रौ. १०.३० वा. ॐकार मित्र मंडळ, नेरुर – वाघचौडी यांचे दोनअंकी “चांडाळ चौकडी’ …. ते परत इलेत….. धुमाकूळ घालूक!! धमाल नाटक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
