मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मालवण दौऱ्यावर असल्याने शहरातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित…

⚡मालवण ता.१०-: मालवण मेढा येथील किल्ले राजकोट येथे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गांचा वाहन चालकांनी वापर करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.

विशेष अतिथींसाठी पर्यायी मार्ग बोर्डिंग मैदान, फोवकांडा पिंपळ, अप्पर डेक हॉटेल, कुशेवाडा, मौनीनाथ मंदिर, राजकोट किल्ला असा असेल. कोळंब मधून मालवण येथे येणाऱ्या वाहनांसाठी सागरी महामार्ग, देऊळवाडा, भरड हा पर्यायी मार्ग असेल. रॉक गार्डनला जाणाऱ्या वाहनांसाठी फोवकांडा पिंपळ, माघी गणेश मंदिर, रोझरी, रॉक गार्डन हा पर्यायी मार्ग असेल. राजकोट किल्ला येथे जाणाऱ्या वाहनांसाठी टोपीवाला हायस्कूल येथे वाहने लावून पायी चालत राजकोट येथे जायचे आहे. मालवण जेटीवरून येणाऱ्या वाहनांसाठी फोवकांडा पिंपळ, नगरपालिका मालवण, भरड मार्गे, देऊळवाडा हा पर्याय मार्ग असेल. मालवण मधील सर्व रस्ते हे नो पार्किंग झोन असतील. वाहनधारकांनी या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन श्री. कोल्हे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page