मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील मसुरे गावचे सुपुत्र आणि सध्या डोंबिवली स्थित असलेले प्रसिद्ध कवी विजय जोशी उर्फ विजो यांच्या ‘टोपीवाले फुगे’ या बालकविता संग्रहाला राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ‘अंकुर साहित्य संघ अकोला, यांचा बालवाङ्मय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
‘टोपीवाले फुगे’ या बालकविता संग्रहाला मिळालेला या वर्षीचा हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. श्री जोशी यांच्या या कविता संग्रहाला मिळालेल्या या पूरस्काराबद्दल साहित्य वर्तुळात कवी विजय जोशी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.