जातीय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने जल्लोष…

⚡सावंतवाडी ता.०२-:
भारत देशात जातीय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतल्याने सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करताना येथील भाजप कार्यालयासमोर सर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा केला.

केंद्र सरकारने नुकताच देशात जातीय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. ब्रिटिश काळात या आधी जातनिहाय जनगणना झाली होती त्यानंतर मोदी शासनाच्या काळात पुन्हा एकदा ही जनगणना होत असल्याने सर्वत्र या निर्णयाचे स्वागत केले जात आहे सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली येथील भाजप कार्यालयासमोर आज सकाळी या निर्णयाचा जल्लोष करण्यात आला यावेळी मोदी सरकारचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो असे नारे देण्यात आले यावेळी जिल्हा निमंत्रक सदस्य मनोज नाईक माजी सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे भाजपा जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष दिलीप भालेकर शहर सरचिटणीस आनंद नेवगी महिला सरचिटणीस मेघना साळगावकर, नागेश जगताप ,मंदार पिळणकर, विपुल वराडकर, महेश बांदेकर,श्याम रेमुळकर,बंटी जामदार,धीरेंद्र म्हापसेकर,अमित गंवडळकर, विराग मडकईकर, विजू साटेलकर, संतोष गावस, अनिश पांगम, संजय वरेरकर, राघवेंद्र चितारी आदि शक्ती केंद्रप्रमुख, बुथ केंद्रप्रमुख आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page